असरअल्ली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील निरीक्षक सुधीर मारशेट्टीवार बेपत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा :
असरअल्ली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत कार्यरत  निरीक्षक  सुधीर मारशेट्टीवार हे १२ ऑक्टोबर पासून बेपत्ता असून असरअल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
सुधीर मारशेट्टीवार हे  १२ ऑक्टोबर रोजी  दुपारी १२:३० वाजता कामा निमित्ताने बाहेर गेले होते. मात्र चार - पाच दिवस उलटूनही घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरु केला.  कुटुंबीयांनी   असरअल्ली  पोलीस ठाण्यात ते बेपत्त्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे.   त्यांच्या घरी   आई - वडील, पत्नी व त्यांच्या ‌दोन चिमुकल्या मुली   व नातेवाईक चिंतेत आहेत.  यामुळे  सुधीर मारशेट्टीवार हे कुठे आढळून आल्यास  ९४०४६६५९४६ , ९४०३३६११४६   या क्रमांकावर  संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-17


Related Photos