राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपात


वृत्तसंस्था /  बीड :  राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले आहे. यानंतर मुंदडा यांनी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने  केज मतदारसंघातून तिकीट दिले होते. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंदडा यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, आता अचानक त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. 
नमिता या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतरही राष्ट्रवादीनं त्यांना पुन्हा संधी दिली होती.   पंकजा मुंडे यांनी नमिता यांना भाजपमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंदडा यांना केजमधून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-30


Related Photos