महत्वाच्या बातम्या

 देवळी तहसील च्या भरारी पथकाकडून अवैध वाळूचे पाच ट्रॅक्टर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या सुचनेनुसार देवळी तहसिल कार्यालयाच्या पथकांनी आंजी येथील नदीघाटातील अवैध वाळुच्या उपस्यावर धाड टाकून पाच ट्रॅक्टरसह वाळूने भरलेल्या ट्रॉली जप्त करुन कारवाई केली.

सदर कारवाई तहसीलदार दत्तात्रय जाधव, नायब तहसिलदार अजय झिले, मंडळ अधिकारी एम.एस.डूबे, मोहन घुले, गौण खनिज शाखेचे अव्वल कारकुण अजय लाडेकर, तलाठी निलेश ठमके, कैलास बुडगे, सारंग भाईक, अक्षय रघुवंशी, पंकज चव्हाण, सुरज वरठी, श्रीकांत पडिले, शिपाई मनोहर हांडे, कोतवाल सतिश काथवटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व उपविभागात व तालुक्यात तपासणी नाका तसेच भरारी पथक स्थापन करण्यात आले असून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. देवळीच्या तहसिलदारांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकांनी आंजी येथील नदीघाटातील अवैध वाळूच्या उपस्यावर भेट दिली. त्यावेळी एकूण पाच ट्रॅक्टर- ट्रॅाली मध्ये वाळुचा भरणा करुन वाहतुक करत असल्याचे दिसून आले. संबंधीत वाहन चालकांना परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन सदर वाळू विना परवाना उत्खनन करुन वाहतुक करत असल्याचे निर्दशनास आल्याने सर्व पाच वाहन जप्त करुन तहसिल कार्यालय देवळी येथे जमा करुन वाहनावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

वाळू तस्करावर कार्यवाही करण्यासाठी पथकांनी लढविली नामी शक्कल -

तहसिल कार्यालयाचे भरारी पथक कारवाईस निघाल्यास रेती तस्करामार्फत जागोजागी खबरी उभे करुन माहिती घेण्यात येते, जेणेकरुन अधिकारी, कर्मचारी पोहोचण्याआधी रेतीवाले वाहने घेऊन पसार होतात. यासाठी देवळीच्या भरारी पथकांनी नामी शक्कल लढवून पथकांतील मंडळ अधिकारी, तलाठी यांनी टॅक्टर ट्रॉली मध्ये छुप्या पध्दतीने जाऊन कारवाई केली. अधिकारी, कर्मचारी हे ट्रॅक्टर ट्रॉली मधून आल्यामुळे तस्करांना सुगावा लागला नाही, असे तहसीलदार, देवळी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos