महत्वाच्या बातम्या

 चितळ शिकार प्रकरणी चार जण वनविभागाच्या ताब्यात


- कुनघाडा (रै.) वनपरीक्षेत्रातील वन विभागाची धडक कारवाई

- ३ आरोपीला न्यायालयीन कोठडी तर १ आरोपीला वन कोठडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील कुनघाडा वनपरीशेत्रातील गीलगाव येथे ३० मार्च रोजी चितळाची अवैध शिकार प्रकरणात चारजनास वन विभागाने ताब्यात घेण्यात आले. पंकज, अरुण व रोहिदास या तीन जणांना १४ दिवसाची १२  एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी व विलास बोदलकर यांना ऐक दिवसाची ०१ एप्रील पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. 

चितळ या वन्यप्राण्याची शिकार झाल्याबाबत ३० मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकारी यांनी कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत  गिलगांव येथे दुपारी १.१५ वाजताचे वाजताचे सुमारास जाऊन संशयीत आरोपी पंकज शंकर पिंपळवार राहते. घराची पाहणी केली असता आरोपीचे घरून, वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मास आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी करून मांस, ताब्यात घेवून पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा करण्यात आला त्यानंतर आरोपीस कुनघाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून त्यांची चौकशी करून त्यांकडून कबूली जबाब नोंदविण्यात आले. असता त्यांनी  दिलेल्या माहितीनुसार सह आरोपी अरूण विठ्ठल भोयर, रोहीदास शंकर मडावी रा. गिलगांव (जमि) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना यांचे विरूध्द  ३० मार्च २०२४ ला ०७६८६/१९२१४२  अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला. इतर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून मा. न्यायालया समोर हजर करण्यात आले. 

पुढील तपास प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसरंक्षक गडचिरोली वनविभाग ङि.वाय. ढेंबरे तथा एम.एम. तावाडे वनपरिक्षेत्र अधिकारी कुनघाडा यांचे मार्गदर्शनाखाली एस.जि. झोडगे क्षेत्रसहाय्यक कुनघाडा, के.एम. मडावी वनरक्षक गिलगांव हे करीत आहे. 

तसेच सदर कार्यवाहीकरीता तनुजा मल्हारी मोढळे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, एस.एस. खोब्रागडे क्षे.स. पश्चिम पावीमुरांडा, आर.बी. दुर्गे वनरक्षक, राहूल चिचघरे वनरक्षक पावीमुरांडा,  एस.यु. खोब्रागडे, एन.बी. गोटा वनरक्षक येडानूर, नंदू वाघाडे संगणक चालक, तथा कुनघाडा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी वृंद व वनमूजर यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos