महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर येथे ३१ डिसेंबर शांततेत व अपघातमुक्त ठेवण्यासाठी ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेची सुरुवात


- मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविणाऱ्याविरुद्ध कारवाई मोहिम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हयात दरवर्षीप्रमाणे यंदाही थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचा जोर चांगला रंगणार आहे. यावर्षी पोलीस विभागातर्फे ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, काही उपाय योजना राबविण्यात येत असुन त्यापैकी ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करून वाहन  चालविणाऱ्याविरुध्द कारवाई मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन उत्साहाच्या भरात गैरकृत्य करणाऱ्या मद्यप्रेमी, दारुच्या नशेत गाडी चालवणे, विना परवाना मद्य सेवन करणे, दंगा मस्ती, गोंधळ घालणे अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या मद्यपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच या पार्श्वभुमीवरुन जिल्हयात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी २८ डिसेंबर २०२२ पासुनच जिल्हयात ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिम राबविले जात आहे. सदर मोहिमे अंतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी नाकाबंदी, ब्रिथ अनालायझर मशिनच्या मदतीने मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींची तपासणी करण्यात येत असुन २८ डिसेंबर २०२२ रोजी राबविलेल्या मोहिमेत अनेक केसेस करण्यात आले आहेत. सदर मोहिम ही कारवाई करण्यासाठी नाहीतर फक्त अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविली जात आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, ३१ डिसेंबर उत्साहात साजरा करावा परंतु सेलिब्रेशनच्या नावांखाली मद्यप्राशन करून मोटार सायकल व कार भरधाव वेगाने चालवुन/स्टंट मारुन अपघात घडवु नये किंवा अपघात होवू नये याची सर्वांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणुनच पोलीस विभागातर्फे ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्द कारवाई मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos