महत्वाच्या बातम्या

 वर्धा विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४७- वर्धा विधासभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच मतदार जनजागृतीसाठी ऑगस्ट २०२३ पासून स्वीपच्या माध्यमातून रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, प्रभात फेरी, बाईक रॅली, मॅरेथॉन, पथनाट्य, भारुड अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

गणेश उत्सव, नवरात्रोत्सवामध्ये नवमतदार व मतदार यादी सुसूत्रिकरण कार्यक्रमांबाबत उपक्रम राबविण्यात आले. या कालावधीत रांगोळी स्पर्धा, पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आली. त्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून ४ हजार ९६३ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.

भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांच्या मतदार नोंदणीबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन मतदार नोंदणी करण्यात आली. मतदार संघातील १६७ स्वस्त धान्य दुकानामधील ७४ हजार १५५ शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकेवर मतदान नोंदणीबाबत स्टिकर लावून जनजागृती करण्यात आली.

वर्धा विधानसभा मतदार संघातील ३३ पेट्रोल पंपामार्फत दुचाकी व चारचाकी वाहनांवर मतदान जनजागृतीसाठी १५ हजार स्टिकर लावून प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदानाचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ११ गॅस एजन्सीमार्फत ५४ हजार गॅस नोंदणी धारकांना सिलेंडरवर स्टिकर लावून लावण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये दर्शनी भागांमध्ये होर्डिंग व बँनर लावून नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश देण्यात आला. २१६ एसटी बसेसवर मतदान जनजागृतीचे स्टिकर व पोस्टरसुध्दा लावण्यात आले. २७१ शाळा व महाविद्यालयामार्फत रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, प्रभात फेरीच्या माध्यमातून दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos