महत्वाच्या बातम्या

 जिल्हा प्रशासनाचा सेवादुत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम : रुपाली चाकणकर


- महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या सेतु केंद्राला भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवादुत प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पाच्या ॲपवर सेवादुताची अपॅाईनमेंट घेऊन त्याला घरी बोलाविल्यानंतर दुताद्वारे घरपोच सेवा उपलब्ध होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकल्पाचे कौतूक केले. कामकरी महिलांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त आहे. राज्यस्तरावर देखील तो राबविण्यात यावा, यासाठी सिफारस करू असे त्यांनी सांगितले.

आढावा बैठकीनंतर श्रीमती चाकणकर यांनी महिलांद्वारे चालविण्यात येत असलेल्या वर्धा येथील सेतु सुविधा केंद्रास भेट दिली. त्यावेळी सेवादुत प्रकल्पाचे त्यांनी कौतूक केले. यावेळी आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने सेवादुत हा नाविन्यपुर्ण प्रकल्प सुरु केला आहे. प्रकल्पाच्या ॲपवर प्राथमिक माहिती भरल्यानंतर सेवादुत नागरिकांच्या घरी येऊन सेवा देतो. कामकरी महिलांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. त्यांना घरबसल्या शासकीय सेवा उपलब्ध होतील, असे या उपक्रमाचे कौतूक करतांना श्रीमती चाकणकर म्हणाल्या. हा प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविण्यात यावा, यासाठी राज्य शासनास सिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने सर्व तालुकास्तरावरील व पुलगाव, सिंदी येथील एकून १० सेतु सुविधा केंद्र महिला गटांना चालविण्यासाठी दिले आहे. प्रशासनाच्या या वैशिष्ट्यपुर्ण उपक्रमाचे देखील त्यांनी कौतूक करत वर्धा येथील सेतु सुविधा केंद्रास भेट देत प्रत्यक्ष महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या या उपक्रमाची पाहणी केली. हा उपक्रम देखील संपुर्ण राज्यात राबविण्यासारखा आहे, असे त्या भेटीप्रसंगी म्हणाले.

मुलींच्या बालगृहाला भेट व पाहणी

वर्धा शहरातील महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने अनुदान तत्वावर चालविण्यात येत असलेल्या उष:काल मुलींच्या बालगृहास देखील श्रीमती चाकणकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बालगृहातील मुलींच्या समस्या व अडचणींबाबत चर्चा केली. बालगृहात दाखल मुलींसोबत त्यांनी संवाद देखील साधला.

वर्धा वर्धिनी विक्री केंद्राला भेट

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केवळ महिला गटांद्वारा उत्पादीत वस्तुंच्या विक्रीसाठी सुरु करण्यात आलेल्या वर्धा वर्धिनी विक्री केंद्रास देखील त्यांनी भेट देऊन पाहणी केली.





  Print






News - Wardha




Related Photos