महत्वाच्या बातम्या

 मनरेगाच्या मजुरीत चार ते दहा टक्के वाढ : महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मिळतेय मजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये मजुरीचे दर सुधारित करण्यात आले असून, चार ते १० टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मजुरी दर आता २९७ रुपये प्रतिदिन झाला आहे.

आम्ही ४०० रुपये मजुरी देणार : राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, मनरेगात मजुरी ७ रुपयांनी वाढविण्यात आली असतानाही ते आता तुम्हाला इतक्या मोठ्या रकमेचे काय कराल असे विचारतील. ते आता धन्यवाद मोदी नावाची मोहीमही सुरू करतील. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक मजुराची दिवसाची मजुरी ४०० रुपये करणार आहे.

मनरेगाचे राज्यनिहाय दर (प्रतिदिन रुपयांत)

राज्य मजुरी हरयाणा : ३७४
अरुणाचल प्रदेश : २३४
महाराष्ट्र : २९७
नागालँड : २३४
सिक्कीम : ३७४
गोवा : ३५६
आंध्र प्रदेश : ३००
उत्तर प्रदेश : २३७
उत्तराखंड : २३७
पश्चिम बंगाल : २५०
तामिळनाडू : ३१९
तेलंगणा : ३००
बिहार : २२८
गुजरात : २८०
कर्नाटक : ३४९





  Print






News - Rajy




Related Photos