लॉयड मेटल कंपनीमुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटेल !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
गडचिरोली जिल्हा हा नेहमीच मागासलेला जिल्हा, अविकसीत जिल्हा म्हणून ओळखल्या गेला आहे. परंतु जिल्ह्याच्या माथी लागलेला हा शिक्का पुसून काढण्यासाठी लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लि. ची औद्योगिक पायाभरणी मैलाचा दगड ठरणार आहे.
जिल्ह्यातील सुरजागड परिसरातील लोहखनीजांवर आधारित लोहप्रकल्पाचे काम चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे वेगाने सुरू आहे. यामुळे सुरजागड खाण आणि कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या कामावर सध्यास्थितीत हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर आणखीही जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेलच तसेच लॉयडस मेटल्स कंपनीला लोहखणीज काढण्यासाठी ३४८. हे.आर जागेची लीज मिळालेली आहे आणि प्रस्तावित कोणसरी लोहप्रकल्पाचा विस्तारीकरणासाठी सदर कंपनीने लोहखनिज काढण्याची मर्यादा ३ दशलक्ष टन प्रतिवर्ष यावरून १० लक्ष टन प्रतिवर्ष एवढी वाढविण्याची मागणी केली आहे यामुळे कोणत्याही गावाला गावाला हानी पोहचणार नसून सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास कोणसरी येथील लोहप्रकल्प तात्काळ सुरु होईल आणि जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न यथाशिग्र संपुष्टात येईल जिल्ह्यातील प्रत्येक युवकाच्या हातात काम आल्याचे दिसून येईल .
जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या सोयी - सुविधासुध्दा अद्यावत होणार आहेत.
लॉयड मेटल्स अॅन्ड एनर्जी लि. च्या माध्यमातून सध्या जिल्ह्यात रोजगार निर्मितीच नाही तर अनेक समाजोपयोगी कार्य सुध्दा केल्या जात आहे. दुर्गम भागातील नागरीकांची आरोग्य सेवा, वृक्ष लागवड, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, होतकरू, खेळाडूंच्या कला - गुणांना वाव देण्यासाठी विविध क्रिडा स्पर्धा, विजेत्यांना आकर्षक पारितोषिके, शिवणकला प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, आयटीआयमध्ये कुशल काम शिकण्याचे तंत्र देवून युवकांना सक्षम करीत आहे
News - Gadchiroli