महत्वाच्या बातम्या

 नागपूरसाठी २६ उमेदवारांचे अर्ज वैध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी काल नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर २७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. वैध अर्जांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे ३ उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार १३ व अपक्ष १० अशा एकूण २६ उमेदवारांचा समावेश आहे.

वैध उमेदवारांमध्ये नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी), योगीराज उर्फ योगेश पतीराम लांजेवार (बहुजन समाज पार्टी), विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस), किवीनसुका सुर्यवंशी ( देश जनहित पार्टी), गरुदाद्री आनंद कुमार (अखिल भारतीय परिवार पार्टी), गुणवंत सोमकुवर ( भारतीय जवान किसान पार्टी),  टेकराज बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), दीपक मस्के (बहुजन महा पार्टी), नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट), फहीम शमीम खान ( माइनोरिटिज डेमोक्रेटिक पार्टी), विजय मानकर (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), विशेष फुटाणे ( बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), श्रीधर साळवे (भीम सेना), सुनील वानखेडे ( राष्ट्र समर्पण पार्टी), सुरज मिश्रा ( कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), ॲड. संतोष लांजेवार (ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॅाक), आदर्श ठाकूर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे ( अपक्ष), धानु वलथरे (अपक्ष), प्रफुल भांगे ( अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), सचिन वाघाडे ( अपक्ष), साहिल तुरकर(अपक्ष), सुशील पाटील (अपक्ष), संतोष चव्हान (अपक्ष) यांचा समावेश आहे.

३० मार्च ही अर्ज मागे घेण्याची  अंतिम तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos