महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा ११ जुलै रोजी भंडारा जिल्हावर दौरा


- नवनिर्वाचित विधानपरिषद आमदारांच्या सत्कार समारंभास लावणार उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे शुक्रवार, ११ जुलै २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नियोजित दौऱ्यानुसार, डॉ. भोयर हे दुपारी १२.३० वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडाऱ्याकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता भंडारा येथे आगमन होईल.

भंडारा येथे ते नवनिर्वाचित विधानपरिषद आमदारांच्या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम लक्ष्मी सभागृह, भंडारा येथे आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमासाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.

सत्कार समारंभानंतर दुपारी ३.३० वाजता डॉ. पंकज भोयर हे शासकीय वाहनाने भंडाऱ्यावरून वर्धाकडे प्रयाण करणार असून, त्यानंतर त्यांच्या पुढील नियोजित दौऱ्यास प्रारंभ होणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos