सिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला शार्ट सर्कीटने आग, मोठा अनर्थ टळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिरोंचा
: येथील ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला आज १२  सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शार्ट सर्कीटने आग लागली. यामुळे काही प्रमाणात औषधसाठा  जळाला असून वेळीच सतर्कता बाळगल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षात अनेक आलमारींमध्ये औषधसाठा साठवून ठेवण्यात आला आहे. या कक्षात अचानक शार्ट सर्कीट झाल्याने आग लागली. यामध्ये एका आलमारीतील औषधसाळा जळाला. उपस्थितांनी तातडीने पाणी टाकून आग विझविली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
मागील काही महिन्यांपूर्वी अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयाला आग लागली होती. यामध्ये लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. रूग्णांनासुध्दा वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे जिवितहाणी टळली होती. याच घटनेची पुनरावृत्ती होतांना सिरोंचा ग्रामीण रूग्णालय वाचले आहे. यामुळे रूग्णालयांमध्ये अग्नीशमन यंत्रणा, तसेच विद्युत यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-12


Related Photos