पेट्रोल २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून काही डॉलरमध्ये उतरत असताना देशातील इंधनाचे दर काही पैशांमध्ये उतरविण्यात येत आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये घसरण सुरु असून आज पेट्रोल  २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त झाले. 
आज दिल्ली मध्ये पेट्रोल ८०.८५  रुपये प्रती लिटर तर डिझेल ७४.७३  रुपये प्रती लिटर आहे. दिल्लीमध्ये ०.७ पैशांनी पेट्रोलचा दर उतरला आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल ८६.३३  रुपये प्रती लिटर आणि डिझेल ७८.३३ रुपये प्रती लिटर झाले आहे. मुंबईमध्ये डिझेल ०.८ पैशांनी स्वस्त झाले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-26


Related Photos