महत्वाच्या बातम्या

 औषधे अन विविध सेवांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळणार सुविधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सोसायट्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. या योजनांद्वारे लेखापरीक्षण पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील २०० वर सोसायट्यांचे कामकाज संगणकीकृत होणार आहे.

डिजिटल होणाऱ्या या सोसायट्यांनी अर्ज केला तर जनऔषधी केंद्र, सीएससी सेंटरही सुरू होणार आहे. त्याशिवाय इतर योजनांची अंमलबजावणी सोसायट्यांना करता येणार असून, एकाच छताखाली शेतकरी, गावकऱ्यांना सोयी-सुविधा मिळणार आहेत.

ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पीक कर्ज देणे, पीक कर्जाची वसुली करण्यासह कर्जाचे पुनर्गठण केले जाते.

शेतकऱ्यांसाठी सोसायट्या हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या सहकार विभागाने लेखापरीक्षण पूर्ण केलेल्या सोसायट्यांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील २०० सोसायट्यांना संगणक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आजवर ४५ हून अधिक सोसायट्यांमध्ये संगणक मिळाले आहेत.

या सोसायट्यांमध्ये सीएससी सेंटर सुरू होणार असून, या सेंटरमधून मिळणाऱ्या सेवा शेतकरी, नागरिकांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे जनऔषधी केंद्रही सोसायट्यांना सुरू करता येणार आहे. जालना जिल्ह्यातील ११ सोसायट्यांची यासाठी निवड झाली आहे. पैकी रोहनवाडी, पानशेंद्रा, धावडा, सिरसगाव सोसायट्यांनी फार्मासिस्ट निवडीसह अन्न व औषध प्रशासनाचा परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या योजनांचाही समावेश -

१. लेखापरीक्षण पूर्ण केलेल्या सोसायट्यांना एलपीजी गॅस, पेट्रोल-डिझेल विक्री, कुसूम संजीवनी योजना, पीएम किसान समृद्धी, ग्रामीण नळपाणी, पुरवठा देखभाल दुरुस्ती, सहकारी संस्थेचा शेतकरी उत्पादक गट आदी विविध योजनांची सेवाही देता येते.

२. त्यासाठी सोसायट्यांनी सहकार विभागाच्या माध्यमातून संबंधित अर्ज करून नियमानुसार प्रक्रिया पूर्ण किरणे गरजेचे आहे.





  Print






News - World




Related Photos