२७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जिल्ह्यात ३७ कलम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : 13 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिन, 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे, 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती, 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री/ शब्ब-ऐ-मेराज/ संत गाडगे महाराज जयंती व 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असून त्या निमीत्याने काही ठिकाणी मिरवणूक तर काही ठिकाणी महाप्रसादाकरीता गर्दी जमत असते.
उन्हाळी शेतीकरीता शेतकऱ्यांना बि-बियाने, खते, रासायनिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावेत व त्यांचा पुरवठा नियमित करावा, पुर्नवसन, वाढती महागाई तसेच विविध मागण्यांना घेऊन निषेधार्थ राजकीय पुढारी मजुर वर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरुन धरणे, मोर्चे, आंदालने, निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 13 फेब्रुवारी 2022 ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
News - Bhandara




Petrol Price




