जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून मोदुमडगू येथील मिस्त्री कुटुंबाला सांत्वन व आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येणाऱ्या मोदुमडगु येथील स्व. रामानंद दिगुराम यांचे निधन झाले. काल १८ एप्रिल २०२३ ला तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून मिस्त्री कुटुंबाचा सांत्वन केले. मिस्त्री परिवाराची परिस्थिती हालाखीची असल्याने मिस्त्री कुटुंबाना जि. प. माजी अध्यक्ष यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी बेबी मंडल ग्रा. पं. सदस्य नागेपल्ली, विशाल रापल्लीवार, मन्नान शेख, मनोद्र बाला, रंजीत हलदर, विश्वनाथ बाला, अनिमा रॉय, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, नरेंद्र गर्गम, विनोद रामटेके, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गेसह आदि उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




