महत्वाच्या बातम्या

 बार्टी कार्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : संत गाडगेबाबा यांच्या १४८ व्या जयंती निमित्य बार्टी प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने संत गाडगेबाबा यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या जिव्हाळ्याचे सबंधांना उजाळा दिला. दीनदलित, पीडित, वंचित आणि दु:खिताच्या कल्याणासाठी या दोन्ही महापुरुषांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी त्यांचे विचार एवढे दाहक व क्रांतिकारी होते की, त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक खरा समाजवादी सत्यशोधक लाभला. स्वच्छता आणि समानता यांचे बीज जनमनात रुजवण्याचे प्रथम कार्य संत गाडगेबाबा यांनी केल्याचे मत बार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे यांनी प्रकट केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश वाहुरवाघ तर आभार मंगेश चहांदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. प्रकल्प अधिकारी सरिता महाजन यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Nagpur




Related Photos