महत्वाच्या बातम्या

 लोकसभा निवडणूक पोस्टल बॅलेट व सर्व्हिस वोटरबाबत प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आगामी लोकसभा निवडणुकीतील विविध विषयांचे प्रशिक्षण जिल्हा कचेरीत सुरू आहे.

त्यामधीलच पोस्टल बॅलेट व सर्व्हीस वोटरबाबत प्रशिक्षण आज नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी लीना फलके उपस्थित होत्या.

निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पोस्टल बॅलेट प्रक्रीया तसेच सर्व्हीस वोटरनी करावयाचे मतदान प्रक्रीया व दिव्यांग व्यक्ती तसे वयोवृध्द व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मतदान केंद्रावरील सुविधाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.





  Print






News - Bhandara




Related Photos