महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


११ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

६६० : सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.

१६६० : औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

१७५२ : पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

१८१८ : इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

१८२६ : लंडन विद्यापीठाची स्थापना.

१८३० : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

१९११ : हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

१९२९ : पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.

१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

१९९० : २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.

१९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

२०११ : १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

११ फेब्रुवारी जन्म

१८०० : छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्‍री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)

१८३९ : अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०२)

१८४७ : अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९३१)

१९३७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बिल लॉरी यांचा जन्म.

१९४२ : कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च २००३)

११ फेब्रुवारी मृत्यू

१६५० : फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५९६)

१९४२ : प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९८६ : तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

१९७७ : भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन. (जन्म: १३ मे १९०५)

१९९३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos