महत्वाच्या बातम्या

 सन मराठी १४ नोव्हेंबरपासून सादर करीत आहे नवी मालिका : शाब्बास सुनबाई


- प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहू पाहणाऱ्या एका ध्येयवादी सूनेची गोष्ट

मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : ८ नोव्हेंबर २०२२ सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आली. सोहळा नात्यांचा हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या.
अशीच एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट, म्हणजेच शाब्बास सुनबाई ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ वाजता प्रसारीत होणाऱ्या या मालिकेतील नायिका संजीवनी ही अत्यंत प्रामाणिक, सारासार विचार करणारी ध्येयवादी मुलगी आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे.
संजीवनीच्या स्वप्नांना खरा संघर्ष करावा लागणार आहे तो तिच्या लग्नानंतर. कसं आहे तिचं सासर? संजीवनीला लग्नानंतर नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार का? ह्या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे.
नायिकेच्या भूमिकेत रश्मी अनपट तर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मयूर खांडगे असे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ह्या मालिकेचे लेखन केलं आहे शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी, तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती सुचित्रा आदेश बांदेकर यांनी.
तेव्हा पाहायला विसरू नका एक नवी कोरी मलिका, शाब्बास सुनबाई! १४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वा. फक्त आपल्या सन मराठीवर.
ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता जाऊ नको दूर… बाबा!, ८.३० वाजता कन्यादान, रात्री ९ वाजता संत गजानन शेगावीचे, ९. ३० वाजता नंदिनी तसेच रात्री १० वाजता सुंदरी ह्या मालिका दाखविल्या जातात.
सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे. 





  Print






News - Mumbai




Related Photos