पूरग्रस्त गुंडूरवाही व पोयरकोटी गावांची परिस्थिती बिकट


-  जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांनी पूरग्रस्त गुंडूरवाही व पोयरकोटी गावांना दिली भेट 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
  काल ११ सप्टेंबर रोजी   भामरागड तालुक्यातील पूरग्रस्त गुंडूरवाही व पोयरकोठी या गावांना  जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांनी भेट देऊन तेथील पूरग्रस्त लोकांच्या  समस्या जाणून घेतल्या.  या दोन्ही गावांमध्ये रात्री अचानक पूर आल्यामुळे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. यामुळे गुंडूरवाही व पोयरकोटी गावांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. 
गावातील  काही घरे जमीनदोस्त झाले. अचानक पूर आल्यामुळे लोकांनी आपले सामान जिथे होते तिथे ठेवून अक्षरशः घर सोडून पळून गेले. वापरायचे कपड्यांसहित सर्व सामान पूराच्या पाण्यात वाहून गेले. भांडीही वाहून गेले. कोंबड़े, बकरे, डूक्कर हे आदिवासी समाजाची  मालमत्ता समजली जाते. तेही वाहून गेले. ज्यांचे सर्व काही वाहून गेला ते गावकऱ्यांच्या मदतीने उदरनिर्वाह करीत आहेत. सर्वे करण्यासाठी आलेली टीम अजूनही या गावात न पोहचल्यामुळे लोकांना अजूनही कोणतीही शासनाची मदत मिळाली नाही. लोकांच्या पीकाचेही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. लोकांपुढे पुढील एक वर्षाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणुन पूरपीडितांचे सर्वे करून त्यांना त्वरित मदत करण्याचे आवाहन जिल्हा परिषद लालसु नोगोटी यांनी केले आहे. दरम्यान  लालसू नोगोटी यांनी गुंडूरवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केन्द्राला भेट दिली. त्या ठिकाणी पूरामुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी असल्यामुळे गावातील शिक्षक व गावकऱ्यांना गावात स्वछता राखण्याचेही आवाहन लालसु नोगोटी यांनी केले. संस्था, संघटना व शासनातर्फे केली जाणारी मदत लवकरच आपल्यापर्यंत पोहचवली जाईल असे गावकऱ्यांशी बोलतांना  लालसू नोगोटी यांनी सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-12


Related Photos