उद्या गोसेखूर्द धरणातून होणार २० हजार क्युमेक्स पाण्याचा अधिक विसर्ग, सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर्द धरणातून उद्या १०  सप्टेंबर रोजी सकाळी ८.१०  वाजतापासून जवळपास २० हजार क्युमेक्स एवढा अधिकचा विसर्ग होण्याची शक्यता. आहे. यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा तसेच उपनद्यांच्या जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्यास्थितीत वैनगंगा नदीवरील गोसेखूर्द धरणातून १३ हजार ७३९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने मिळालेल्या इशाऱ्यानुसार उद्यापासून आणखी पाण्याचा अधिक पाण्याचा विसर्ग होणार आहे. यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होणार आहे. वैनगंगा व प्राणहिता नदीकिनारी नागरीकांनी सतर्क रहावे, गणपती विसर्जनादरम्यान विशेष खबरदारी घ्यावी, पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, नदीकिनारी जाणे टाळावे, स्त्रियांनी कपडे धुणे वा इतर धार्मिक कार्यक्रमाकरीता नदीकिनारी जाणे टाळावे, अत्यावश्यक कारणास्तव जात असल्यास खबरदारी घ्यावी, जनावरे धुणे, गाड्या धुणे आदी कारणांसाठी नदीकिनारी जाउ नये, पर्यटकांनी सेल्फीचा मोह टाळावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-09


Related Photos