महत्वाच्या बातम्या

 ९ व १३ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व तलमले आयटीआयच्या वतीने ९ व १३ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नोकरी इच्छुक जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तलमले आयटीआय महिला आश्रम येथे सकाळी ११ वाजता आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात वैभव एन्टरप्रायजेस नागपूर, पटेल स्कील प्रा.लि. नागपूर व सुझकी मोटर्स गुजरात ही कंपनी मेळाव्यात सहभागी होणार असून त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पदांकरीता उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यामुळे इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांनी मुळ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र घेऊन रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos