महत्वाच्या बातम्या

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा यांची उंच भरारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज चे आयोजन ७ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. या मध्ये  जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट (टॉप) स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथील प्रशिक्षणार्थीं  समसुद्दीन  शेख  याने प्रथम, तर अजित रोटके याने  द्वितीय क्रं. प्राप्त केले. सदर विजेतांना २६ जानेवारी २०२४ रोजी गणतंत्र  दिनानिमित्त भंडारा जिल्ह्याचे ना. पालकमंत्री विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा गोंदिया लोकसभा खासदार ना. सुनील मेंढे व भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहायक आयुक्त सुधाकर झळके, यांच्या हस्ते या स्पर्धकांना प्रत्येकी रुपये एक लक्ष बिज भांडवल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रमुख प्राचार्या जे. व्ही. निंबार्ते  यांनी आवाहन केले होते की, या चॅलेंजमध्ये सामील होण्याचा एक अद्वितीय अवसर आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील नवीन आणि आधुनिक दृष्टिकोनात संलग्न होवू शकतं. प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्प निदेशक डि. एस. उके आणि प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्याचा एक आदर्श रूपांतरण साधून तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगल्भता आणि समृद्धी केली आहे. त्यांनी एक नवीन तंत्रज्ञानिक प्रकल्प तयार केला आहे, ज्यामुळे उद्योग क्षेत्रात  अधिक प्रगति साधण्यात मदत  मिळवू शकते. संस्थेचे प्राचार्या, शिल्पनिदेशक, निदेशक व इतर कर्मचारी यांनी निवड झालेल्या  प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos