महत्वाच्या बातम्या

 अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


- आमगाव-गोंदिया मार्गावरील तांडा येथील घटना; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्राम तांडा येथील लाडो ढाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रुपचंद फत्तुजी गजबे (४३ वर्षे, सध्या रा. दागोटोला) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी २ सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपचंद गजबे हे दुचाकीने प्रवास करत असताना ग्राम तांडा येथील लाडो ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. संबंधित वाहनचालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याची तक्रार करण्यात आली आहे. या धडकेत रुपचंद गजबे गंभीर जखमी झाले. मात्र, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आशिष घुमराज येसनसुरे (२३ वर्षे, रा. मुरीं, संजय नगर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाची ओळख पटविणे आणि घटनेबाबत पुढील तपास करणे आवश्यक असून, या प्रकरणाचा तपास गोंदिया ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे.





  Print






Related Photos