महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३१ जानेवारी महत्वाच्या घटना

१९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

१९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

१९२९ : सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

१९४५ : युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.

१९४९ : बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

१९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.

१९५० : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

१९९२ : राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना

३१ जानेवारी जन्म

१८९६ : कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)

१९३१ : गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)

१९७५ : चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.





  Print






News - todayspecialdays




Related Photos