महत्वाच्या बातम्या

 शुभ मंगल योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळेसाठी १० हजार रुपये अनुदान 


- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हयात शुभ मंगल नोदणीकृत विवाह योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वधूच्या पालकाची वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी असून वधू जिल्हयातील रहिवासी असावी.

अश्या कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी प्रती जोडपे १० हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते.व सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे २ हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन तसेच विवाह नोंदणी शुल्क यावर होणारा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते.

तरी जिल्हयातील सर्व सक्रिय स्वयंसेवी संस्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सामुहिक विवाह सोहळे आयोजित करुन अनुदानास पात्र कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी मदत करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos