महत्वाच्या बातम्या

 मूरखळा माल येथे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते १० लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भुमिपूजन


- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचा कायापालट करणार : आमदार डॉ. देवराव होळी

- वारकरी संप्रदाय सभागृह बांधकाम व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज मंदिर येथे संरक्षण भिंतीच्या प्रत्येकी १० लक्ष रु. च्या कामांचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते आज मुरखळा माल येथे २५-१५ ग्रामीण पायाभूत सुविधा निधी अंतर्गत विठ्ठल आश्रम वारकरी संप्रदाय सभागृह बांधकाम १० लक्ष रु. व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज मंदिर येथे संरक्षण भिंत बांधकाम १० लक्ष रु. भुमीपुजन सोहळा पार पडला. 

याप्रसंगी दिलीप चलाख, प्रतीक राठी, तुषार सातपुते, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कालीदास नैताम, राजेश झाडे, मुन्ना गटलेवार, गुणवंत मंगर, लालाजी सुर्यवंशी, वारकरी संप्रदायाचे गडचिरोली जील्हा अध्यक्ष हभप डॉ. नागापुरे, आत्माराम बुरे, सुधाकर बुरे, प्रकाश तुंबडे, बोऔडकु, पा. बुरे, पत्रु कुथे आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos