महत्वाच्या बातम्या

 कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय आयसीयूमध्ये ठेवता येणार नाही : गंभीर रुग्णांसाठी केंद्र सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याबद्दल केंद्र सरकारने रुग्णालयांसाठी नवी मार्गदर्शत तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार यापुढे कुटुंबियांच्या परवानगीशिवाय गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवता येणार नाही.

जर रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर असेल आणि त्यात कुठलीही सुधारणा होत नसेल तर जाणूनबुजून त्याला आयसीयूमध्ये ठेवता येणार नाही.

आरोग्य मंत्रालयाने २४ डॉक्टरांच्या पथकाच्या शिफारशींच्या आधारावर नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. एखाद्या गंभीर आजारात किंवा महामारीत ज्या ठिकाणी मर्यादित औषधे किंवा उपचाराची साधने उपलब्ध आहेत त्या ठिकाणी गंभीर रुग्णांना प्राधान्य द्यावे लागेल. नव्या गाईडलाईन्सनुसार रुग्णाला उत्तम सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. रक्तदाब, पल्स रेट, रेस्परेटरी रेट, हार्ट रेट, ऑक्सिजन, युरीन आऊटपूटसह विविध सुविधा रुग्णाला मिळायला हव्यात. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला आयसीयूमधून डिस्चार्ज देणे सक्तीचे राहील.

या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करता येणार -

जर एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज असेल, श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल, हार्ट ॲटॅक किंवा कार्डीयाक ॲस्ट आला असेल, रक्ताच्या उलट्या होत असतील, अवयवाची गरज असेल अशा रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करता येऊ शकते. तसेच एखादा रुग्ण बेशुद्ध असेल आणि त्याला ऑक्सिजनची गरज असेल. प्रकृती अतिशय गंभीर असेल किंवा शस्त्रक्रियेनंतर प्रकृती अधिक गंभीर होण्याचा धोका असेल अशा रुग्णांनाही आयसीयूमध्ये दाखल करता येऊ शकेल.





  Print






News - World




Related Photos