महत्वाच्या बातम्या

 भीषण अपघात : १ जण मृत्यू तर १ किरकोळ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जवळ असलेल्या चिचपल्ली गावा जवळ कार उलटुन भीषण अपघात घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात चालकाचा गाडी खाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला तर १ किरकोळ जखमी झाला. तर त्यात तिघे सुखरूप आहेत.

माहितीनुसार, हर्षल देवाळकर (32) रा. दूध डेअरी परिसर, जलनगर वार्ड, चंद्रपूर असे मृतकाचे नाव असून एका मित्राने कार खरेदी केल्याने पार्टी करण्यासाठी ५ मित्र घेऊन जुनोना मार्गावर गेले असता, मृतक हर्षल याने वाहन चालवण्याची जिद्द केल्याने त्याला वाहन चालवायला देण्यात आले. हर्षलने भरधाव वेगात कार पळवली यात नियंत्रण सुटल्याने कार जुनोना-लोहारा या मार्गावर वाहन पलटले व त्यांच्या अपघात झाला. यात हर्षल गाडी खालीच दबला गेला व एक किरकोळ जखम झाला. उर्वरित तिघांना फार काही झाली नाही.





  Print






News - Chandrapur




Related Photos