महत्वाच्या बातम्या

 पोलीस पाटील पदभरती केंद्र परिसरात कलम १४४ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : साकोली उपविभागातील पोलीस पाटील पदभरती-२०२३ करिता २३ एप्रिल २०२३ रोजी नंदलाल पाटील कापगते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कृष्णमुरारी कटकवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल, साकोली येथे परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परिक्षा केंद्रावर २२ ते २४ एप्रिल २०२३ पर्यंत २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली असून कोणत्याही खासगी वा सार्वजनिक जागेमध्ये खालील प्रमाणे कृती करण्यास प्रतिबंध करण्याकरीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

परिक्षा केंद्रावर हत्यार बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, भाषणे करणे, घोषणा करणे, परिसरात टेलिफोन बुथ, झेरॉक्स मशिन यांनी व्यवसाय करणे.,परिक्षा ईमारतीत मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादीचा वापर करण्यास मनाई राहील, असे उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos