महत्वाच्या बातम्या

 मैदानी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते : खासदार अशोक नेते


- सूर्योदय क्रीडा मंडळ व ग्राम पंचायत भजेपार च्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्यीय महिला /पुरुष कबड्डीचा महासंग्राम भजेपार चषक-२०२३

- या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : दर दहावर्षीची परंपरा कायम ठेऊन सूर्योदय क्रीडा युवांनी व ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांच्या लोकसहभागातून मोठया आनंदाने एकत्रीत येऊन आंतरराज्यीय महिला/ पुरुष कबड्डीचा महासंग्राम भजेपार चषक- २०२३ कबड्डी स्पर्धा छ. शिवाजी महाराज स्टेडियम मौजा- भजेपार ता. सालेकसा जि. गोंदिया या ठिकाणी मोठया भव्य दिव्य रोषणाई च्या विशिष्ट आकर्षकांने स्पर्धचे आयोजन करण्यात आले.

या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन व अध्यक्षीय स्थान खासदार अशोक नेते यानांच देण्यात आले हे विशेष बाब म्हणजे या परिसरातील ३० ते ४० वर्षांपासूनची नागरिक जनतेची, विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, जी प्रतीक्षा होती ती म्हणजे बरोंनी एक्सप्रेस ट्रेनचा थांब्याची यामूळे दोन्ही स्थान दिलेल्या नागरिकांचे अभिनंदन करत खासदार अशोक नेते यांनी या कबड्डी महासंग्राम भजेपार चषकाचा शुभारंभ फित कापून संपन्न केला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन/अध्यक्षीस्थानावरून खासदार अशोक नेते यांनी बोलतांना म्हणाले कि, युवक व महिलांनी मैदानी खेळ खेळावे. आजकाल मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होतांना दिसते. मैदानी खेळ हा लोप पावत असून आजच्या काळात युवकांमध्ये क्रिकेट हा लोकप्रिय होतांना दिसतो. परंतु इतरही खेळ खेळण्याबरोबरच मैदानी खेळाकडे दुर्लक्ष न करता अशा मैदानी खेळाचे आयोजन इतरही मंडळाने करावे. मैदानी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते.

कबड्डी हा मैदानी खेळ म्हणून युवा वर्गानी व महिलांनी मोठया उत्साहाने आनंदाने खेळ खेळावे. कबड्डी मध्ये रेप्री (पंच) पंचांची भुमिका महत्वाची असते, पंचानी एखादी निर्णय देतांना चुकीचा जरी निर्णय नसेल पण तो निर्णय एखाद्या टीम मान्य नसतो अशा वेळी मोठया प्रमाणात वाद विवाद, भांडण, झगडे होतात. यात पोलिस स्टेशन पर्यत सुद्धा तक्रारी गेलेल्या आहेत. म्हणुन याकरिता पंचाचा निर्णय योग्य रीतीने मानूनच कबड्डी हा खेळ खेळावा. या मैदानी खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिक दुष्टया चांगले राहण्यासाठी खेळ खेळावे, असे प्रतिपादन या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन व अध्यक्षीय स्थानवरून खासदार अशोक नेते यांनी केले.

पुढे बोलतांना खा. नेते म्हणाले,  सालेकसा वासिय जनतेनी दिलेले एवढ प्रेम मनापासून स्वीकार करतो. अनेक दिवसापासून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सालेकसा या रेल्वे स्टेशनला बरोंनी एक्सप्रेसचा थांबा द्या. तेव्हाच आपल्या कार्यालयातून जाईन अन्यथा जाणार नाही. अशी विनवणी केल्यानंतर विनंतीला रेल्वेमंत्री यांनी मान देऊन लगेचच थांब्याचा पत्र काढला स्वतः करून घेतले त्यामुळे सालेकसा वासिय जनतेची प्रतिक्षा पुर्ण झाली. सालेकसा वासिय जनतेचे अभिनंदन करतो. 

याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी खेळाडूंचे हस्तांदोलन करत नाशिक विरुद्ध शिर्डी साईबाबा कबड्डी चा सामन्याचे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

स्वागताचे विशेष म्हणजे सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत जिल्हा परिषद प्रा. शाळा भजेपार या विदयार्थी चमुने लेझीम द्वारे आकर्षणाने साकार करत विविध फलके दाखवुन ओळख पटवून दर रविवारला स्वच्छता अभियान, फटाके मुक्त दिवाळी, झाडे लावा झाडे जगवा, आपले जीवन मूल्य, पाणी वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव, जल जीवन संवर्धन, श्रमदान, भारत मातेची प्रतिमा, तिरंगा झेंडा, लोकनृत्य अशा विविधतेनी आकर्षणाने  विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे नृत्य सादर करून पाहुण्यांचे उत्कृष्ट स्वागत केले.

महिला /पुरुष पुरस्कार -

प्रथम परितोषिक ५१ हजार १ द्वितीय परितोषिक ३१ हजार १ तृतीय परितोषिक २१ हजार १ व आकर्षक चषक, विशेष बक्षीसे मानकरी विजेत्या संघाला देण्याचे आयोजन केले.

सालेकसा तालूक्यातील भजेपार हे गाव एकोप्याचा, आदर्शाचा, जिव्हाळ्याचा, लोकसहभागाचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर चालणारा, खेळण्याबरोबरच एकात्मता,कुठल्याही जाती धर्माचा, पक्षाचा भेदाभेद न करता एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करतात. 

यावेळी प्रामुख्याने उद्घाटक खासदार अशोक नेते, माजी आमदार संजय पुराम, सरपंच चंद्रकुमार बहेकार, जि.प. सदस्या वंदना काळे, जि.प. सदस्या उषा मेंढे, जि.प .सदस्या छाया नागपूरे, जि.प. सदस्या छबुताई ऊके, पं स. सदस्या अर्चना मडावी, माजी. जि.प. सदस्या तता दोनोडे, प.स.सदस्या रेखा फुंडे, सुनिल अग्रवाल, प्रभाकर दोनोडे, डाॅ. अजय उमाटे, यशवंत मानकर, जियालाल पंधरे, भाजपा युवा नेतेे तथा ओबीसी तालूकाअध्यक्ष देवराव चुटे, अरविंद फुंडे, राजूभाऊ दानोडे, संतोष बोहरे,आर.डी. रहांगडाले, परसराम फुंडे, डाॅ. खुशाल शिवणकर,कैलास बहेकार, रामदास हतीमारे, मनोज बोपचे, बंडू कटरे, विकी भाटिया, कमलबापु बहेकार, यशवंत शेंडे तथा सूर्योदय क्रीडा मंडळाचे सदस्यगण, गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos