मोटार वाहन विधेयक '२०१९' ला राष्ट्रपतींची मंजूरी : आरटीओ चे नवीन नियम आजपासून लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
लोकसभा आणि राज्यसभेत मोटर वाहन विधेयक २०१९ मंजूर केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला शुक्रवारी मंजुरी दिली. यामध्ये नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. नव्या कायद्यानुसार करण्यात आलेल्या नियमांनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला आता कठोर शिक्षा होणार आहे. अल्पवयीन मुलाने जर अपघात केला तर त्याच्या पालकांना ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
नवीन नियम आणि दंड
कलम १७८ नुसार विना तिकीट प्रवास केल्यास ५०० रुपये दंड.
कलम १७९ नुसार अधिकाऱ्याने सांगितलेले नियम पाळले नाहीत तर २ हजार रुपये दंड.
कलम १८१ नुसार विना परवाना वाहन चालवल्यास ५ हजाराचा दंड भरावा लागणार. 
कलम १८२ नुसार वाहन चालवण्यास पात्र नसताना ते चालविल्यास १० हजार दंड भरावा लागणार.
कलम १८३ नुसार ओव्हरस्पिड वाहन चालवल्यास १ हजार ते ३ हजारांपर्यंतचा दंड भरावा लागणार.
कलम १८४ नुसार धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास ५ हजार दंड भरावा लागणार.
कलम १८५  नुसार दारू पिऊन गाडी चालवल्यावर १० हजार दंड भरावा लागणार.
कलम १८९ नुसार स्पिडिंग/रेसिंग करणाऱ्यावर ५  हजारांपर्यंत दंड आकारण्यात येणार. 
कलम १९२ A नुसार वाहनांची कागदपत्रे न काढता वाहन चालवल्यास १० हजार दंड भरावा लागणार.
कलम १९३ नुसार लायसन्स निगडित नियम तोडल्यास २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल. 
कलम १९४ नुसार ओव्हरलोडिंग असेल तर २ हजार रुपये तर प्रति टन सामानानुसार २० हजारांपर्यंतच्या दंड आकारण्यात येईल. 
कलम १९४ A नुसार पॅसेंजरचे ओव्हरलोडिंग असेल तर १  हजार रुपये पर पॅसेंजर इतका दंड . 
कलम १९४ B नुसार आता सीट बेल्ट लावला नसेल तर १ हजार रुपये दंड भरावा लागणार. 
कलम १९४  C नुसार स्कुटर आणि बाईक वर दोन पेक्षा अधिक लोक असतील तर २ हजार दंड आणि तीन महिने परवाना रद्द होणार. 
कलम १९४  D नुसार विनाहेल्मेट २ हजार रुपये दंड आणि तीन महिने परवाना रद्द होणार. 
कलम १९४  E नुसार रुग्णवाहिकेसारख्या वाहनांना रस्ता न दिल्यास आता भरावा लागणार १० हजार रुपये दंड. 
कलम १९९  K नुसार बिना इंशुरन्स वाहन चालवल्यास २ हजार इतका दंड. 
कलम १९९ नुसार नाबालिक व्यक्तीने वाहन चालवल्यास वाहनाच्या मालकाला दोषी मानून ३ वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा. 
कलम १८३,१८४,१८५, १८९,१९०,१९४ C ,१९४ D ,१९४ E नुसार अधिकाऱ्यांना वाहन परवाना सस्पेंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, बिना लायसन्स गाडी चालवणे अशा गोष्टी बदलाव्या लागतील अन्यथा भला मोठा दंड भरायला आणि मिळेल ती शिक्षा भोगायला वाहन चालकांना तयार रहावे लागेल.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-11


Related Photos