आदिवासी विकास सप्ताहानिमित्त जिल्हाभरात नक्षलविरोधी शांतता रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
२८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला विरोध करण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने आदिवासी विकास सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत जिल्हाभरात नक्षलविरोधी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नक्षलविरोधी शांतता रॅलीमध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरीक, महिला व विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नक्षलवाद हटाओ, नक्षलवाद मुर्दाबाद अशा घोषणा देत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी पोलिस दलाने आदिवासी विकास सप्ताहात आपण सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे शांतता रॅलीत सहभागी होत आनंद व्यक्त केला.
पेंढरी उपविभागातील आबालवृध्दांनी महात्मा गांधी यांचा मुखवटा तोंडावर चढवून हिंसा नको अहिंसा हवी असे म्हणत रॅलीत सहभाग नोंदविला. जिल्ह्यात काढण्यात आलेल्या शांतता रॅलीमध्ये मरपल्ली, जिमलगट्टा, असरअल्ली या दुर्गम भागातील जनतेसह जवळपास ४ ते ५ हजार नागरीकांनी सहभाग घेतला. मुसळधार पावसातही नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आदिवासी  विकास सप्ताहाच्या निमित्ताने नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होवून मोठ्या प्रमाणात नक्षलवादाविरोधात नागरीक स्वतःहून पुढे येण्यास मदत झाली, अशी माहिती पोेलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-30


Related Photos