महत्वाच्या बातम्या

 नागरिकांना येणाऱ्या आपत्तींबद्दल सावध करण्यासाठी एकात्मिक इशारा प्रणाली विकसित


- खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला केन्द्रीय दुरसंचार राज्यमंत्री डॉ. देवुसिंह चौहान यांचे उत्तर प्राप्त
- खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या १८१३ अंतर्गत प्रश्न उपस्थित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा / नवी दिल्ली : देशात आपत्ती आल्यास नागरिकांच्या मोबाईलवर संदेश येतात, त्यामुळे नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होत असतात, सामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊन सामान्य नागरिकांना पाठवले जाणारे आणीबाणीचे अलर्ट संदेश व्यक्तीच्या गोपनीयतेला धोका निर्माण करतात की नाही, आपत्ती व्यवस्थापन बाबत सूचना प्राप्त झालेल्या एकूण मोबाइल फोनच्या संख्येचा तपशील, देशात सेल ब्रॉडकास्टिंग आधारित आणीबाणी अलर्ट सिस्टम आहे किंवा नाही या संदर्भात खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या १८१३ अंतर्गत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला केन्द्रीय दुरसंचार राज्यमंत्री डॉ. देवुसिंह चौहान  यांचे उत्तर प्राप्त झाले. आपत्ती व्यवस्थापनात दुरसंचार तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. गृह मंत्रालय आणि दळणवळण मंत्रालयाने एकत्रितपणे नागरिकांना येणा-या आपत्तींबद्दल सावध करण्यासाठी एकात्मिक इशारा प्रणाली (SACHET) विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर करून नागरिकांना सतर्क करण्यासाठी लघु संदेश सेवा (एसएमएस) पाठवले जाते. 

ऑगस्ट २०२१ पासून ही प्रणाली सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि आतापर्यंत एकूण १ हजार ३५९ कोटी एसएमएस पाठवले गेले आहेत. आपत्ती जागरूकता अधिक सुधारण्यासाठी, दोन्ही मंत्रालयांनी सेल ब्रॉडकास्टिंग आधारित आपत्कालीन इशारा प्रणाली विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांमध्ये मोबाइल उपकरणांवर गंभीर आणि वेळ संवेदनशील आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रसारित करण्यास अनुमती देते. ही प्रणाली स्वदेशी पध्दतीने तयार केलेली असुन सर्वसमावेशक चाचणी करुन कार्यान्वीत केलेली आहे. या दोन्ही प्रणाली माहितीचा प्रसार सुनिश्चित करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी डिझाइन केल्या आहे व सामान्य नागरिकांच्या गोपनीयतेला कोणताही धोका नसल्याचे उत्तरातुन केन्द्रीय दुरसंचार राज्यमंत्री डॉ. देवुसिंह चौहान यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Wardha




Related Photos