माडेआमगाव जवळ पुलाखाली नक्षल्यांनी लावलेला बाॅम्ब बिडीडीएस पथकाने केला नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चामोर्शी तालुक्यातील रेगडी पासून ३ किमी अंतरावर असलेल्या घोट मार्गावरील माडेआमगाव जवळ एका पुलाखाली नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने लावलेला २० ते २५ किलो चा बाॅम्ब पोलिस दलातील बाॅम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून नष्ट केला आहे. 
माडेआमगाव जवळील पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटके लावले असल्याचे आज २४ जुलै रोजी उघडकीस आले. तातडीने बाॅम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण करण्यात आले. पथकाने तातडीने बाॅम्ब निकामी केला आहे. यामुळे नक्षल्यांचा कट उधळल्या गेला आहे. 
१ मे रोजी अशाच प्रकारे कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळील पुलाखाली स्फोटके लावून घातपात घडवून आणला होेता. या घटनेत १५ जवान शहीद झाले होते. आता नक्षल्यांनी दुसऱ्या भागात अशा घटना घडविण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे दिसत आहे. माडेआमगाव - घोट मार्ग अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या परिसरात आजपर्यंत नक्षल्यांनी अशा मोठ्या घटना घडविल्या नाहीत. मात्र आता नक्षल्यांनी घातपाताचा कट रचल्यामुळे पोलिस विभाग या भागात शोधमोहिम तिव्र करीत आहे. 
जांभुळखेडाच्या घटनेच्या तपासादरम्यान नक्षली चळवळशी सबंधित अनेक मासे गळाला लागले आहेत. यामुळे चवताळलेले नक्षली आणखी घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचे या घटनेमुळे निदर्शनास येत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-24


Related Photos