भारताचे चांद्रयान उतरणार आहे तिथे ‘एलियन्स’ चे वास्तव्य, ‘नासा’ चा दावा


वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :  भारताचे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरणार आहे त्या चंद्राच्या कधीही उजेडात न आलेल्या भागात ‘एलियन्स’चे वास्तव्य होते व आताही आहे अशा स्वरूपाचा खळबळजनक दावा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने केला आहे. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याच्या घटनेस ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘नासा’ने चंद्राच्या कधीही उजेडात न आलेल्या भागाची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून या छायाचित्रांचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे.
‘द नासा आर्काइव – ६० इयर्स इन स्पेस’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध छायाचित्रांमध्ये सदर छायाचित्रांचा समावेश आहे. छायाचित्रात चंद्रावरचा नेहमी अंधारात असलेला भाग दाखवण्यात आला आहे. तेथे अनेक ठिकाणी चौकोनी आकाराच्या टेकडय़ा दिसत आहेत. त्यावर एलियन्सचे वास्तव्य होते असा दावा ‘नासा’ने केला आहे. तसेच या फोटोंमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी गडद काळ्या रंगाचे त्रिकोणही दिसत आहेत तर काही ठिकाणी जहाजासारख्या आकृत्याही दिसत आहेत. तज्ञांच्या मते या फोटोकरून चंद्रावर लाखो वर्षांपूर्वी एलियन्सचे वास्तव्य होते हे अधोरेखित करण्यात आले आहे. एलियन्सच्या अस्तित्वाचे ठसे येथेच असल्याचे तज्ञांनी सांगितले तर तज्ञांनी आजही चंद्रावर एलियन्सचे वास्तव्य असल्याचा दावा केला आहे.
५० वर्षांपूर्वी अमेरिकेने ‘अपोलो-११ ’ या अंतराळयानातून नील आर्मस्ट्राँग, मायकल कॉलिन्स आणि ऍडविन एल्ड्रिन या तीन अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले होते. त्यावेळी ‘नासा’ने चंद्राची छायाचित्रे काढली होती. त्यामागील रहस्य आता उलगडण्यात आले असल्याचे सांगत त्यांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.  Print


News - World | Posted : 2019-07-22


Related Photos