महत्वाच्या बातम्या

 पेटगाव येथे ग्रामस्वच्छता अभियानातुन स्वच्छतेचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिन्देवाही तालुक्यातील पेटगाव येथे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, शासकीय व निमशासकिय कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, गावातील सर्व मंडळे व समस्त पेटगाव ग्रामवासीय यांच्या संयुक्त पुढाकारातुन संपूर्ण गावामध्ये स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.

गावातील केरकचरा, रस्त्यावरील शेवाळ, सांडपाणी नाली सफाई, कचरा कुंडी सफाई, इत्यादी स्वच्छता करुन गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यात आले. मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या स्वच्छता अभियानाला दाद देवुन पेटगाव या गावाने संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचे आव्हान स्वीकारले. त्यानुसार ग्रामस्वच्छता करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. आणि गावाचे रुपच पलटुन गेले.

सदर मोहीमे अंतर्गत पेटगाव गावातील धार्मिक मंदिरे, अंगणवाडी, शाळा, रस्ते, चौक, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक, कचरा, बाटल्या, पालापाचोळा एकत्र करुन त्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात आले व सरतेशेवटी सरपंच सौ. दर्शना मगरे यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर स्वच्छता मोहीमेचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos