महत्वाच्या बातम्या

 जागतीक स्मरण दिन सप्ताह निमीत्य कामगारांना वाहतुकीचे नियमाबाबत माहिती देवून त्यांचेशी चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : आज २१ नोव्हेंबर २०२३ रोजी १६:०० वाजता अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंघल (वाहतुक) मुंबई, पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके वाहतुक विभाग नागपुर यांचे आदेशाने स.पो.नि. रवींद्र खैरकर यांचे मार्गदर्शना पोउपनि उमाकांत गौरकार व पोलीस सह जागतीक स्मरण दिन सप्ताह निमीत्य राजोरी स्टील इंडस्ट्रीज MIDC मुल या कंपनी मध्ये मॅनेजर मनिष रक्षमवार यांचे उपस्थीत ५० ते ६० कामगार यांना वाहतुकीचे नियमा बाबतची माहिती त्यांना देवून व त्यांचेशी चर्चा करून प्रबोधन घेण्यात आले. स्मरण दिना निमीत्य वृक्षा रोपन केले. 

सदर कार्यक्रमास ५० ते ६० कर्मचारी उपस्थित होते.

वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना -

१) अवजड वाहन नेहमी दुसऱ्या लेन मध्ये चालवावे., गणवेश नीटनेटका असावा, पूर्ण वेळ झोप घेऊनच वाहन चालवावे,वाहनांची स्थिती काय आहे ही खात्री करूनच वाहन चालवावे.

२) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा

३) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.

४) ट्रिपल सिट प्रवास करु नये.

५) दारू पिवून वाहन चालवू नये.

६) मो.सायकल चालवितांना नेहमी हेल्मेटचा वापर करावा

७) वाहन चालवितांना नेहमी वेगमर्यादा चे पालन करावे.

८) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.

९) गावांमधील रस्त्याने महामार्गावर येते वेळेस व महामार्ग ओलांडत असताना वाहतूक बघून सुरक्षित पणे ओलांडणे.

१०) विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.

११) वाहन चालवतांना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.

१२) चारचाकी वाहन चालवतांना चालक  व  सहप्रवासी यांनी  सीटबेल्ट वापरावे.

१३) मोटर सायकल चालवितांना नेहमी सर्व्हिस रोड चा वापर करावा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसेल त्या ठिकाणी शोल्डर लेन चा वापर करावा.

१४) महामार्गावर वाहन चालवताना आपले वाहन धोकादायक परिस्थितीत कोणतेही ठिकाणी थांबवू नये.

१५) वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने पाठीमागील वाहनाने समोरील वाहनास धडक देवून अपघात घडतात. 

१६) वाहतुकीचे नियम न पाळल्यास अपघात झाल्यावर कुंटुबांचे आर्थीक, मानसीक, शाररीक नुकसान होवुन वेळ वाया जातो असे लोकांना पटवुन सांगीतले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos