निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्ती व्हीडीओ ग्राफरचे प्रशिक्षण संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम काही दिवसात लागण्याची शक्यता घेता जिल्हा प्रशासनाने निवडणुक विषयक कामाचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. त्यामध्ये आता सर्व विषयांचे प्रशिक्षण पुर्ण झाले असुन आज या निवडणुक प्रक्रीयेत नियुक्त व्हीडीयोग्राफरच्या चमुचे देखील प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये नोडल अधिकारी प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी नामनिर्देशन,मतदान व मतमोजणी सह या संपुर्ण प्रक्रीयेत व्हिडीयोग्राफी ही महत्वाची प्रक्रीया असून यामध्ये विडीयोग्राफरनी अखंडीत चित्रीकरण करावे, निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामध्ये तटस्थपणे कार्य करणे अपेक्षीत असल्याचे सांगितले.जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी संदीप लोखंडे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी शैलजा दांदळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी लोखंडे यांनी वेबकास्टींग विषयी देखील माहिती दिली. तसेच केलेल्या चित्रीकरणाचा संपूर्ण अहवालही व्हिडीयोग्राफरना देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
News - Bhandara