रिटर्न फाइल करणाऱ्यांना ३१ जुलैपूर्वी पॅन - आधार लिंक करावे लागणार


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  ३१ जुलैपूर्वी   पॅनला आधार कार्ड लिंक न केल्यास   रिटर्न फाइल करता येणार नाही. आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम १३९  एएअंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळानं आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून ३०  सप्टेंबर २०१९  पर्यंत वाढवली आहे. परंतु रिटर्न फाइल करणाऱ्यांना ३१  जुलैपूर्वीच पॅन आणि आधार लिंक करावे  लागणार आहे. अन्यथा त्यांना रिटर्न फाइल करता येणार नाही.  त्याचबरोबर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. 
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं ३१  मार्च २०१९  पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यास सांगितलं होतं. परंतु ती मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा (सीबीडीटी) नं वाढवली आहे. त्यामुळे आता ३०  सप्टेंबर २०१९  पर्यंत आपल्याला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करता येणार आहे. परंतु तरीही १ एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीनं स्पष्ट केलेलं आहे. 
  केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ अ हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आले आहे. बोगस कागदपत्राच्या आधारे पॅन कार्ड तयार केली जातात. त्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रानं हा तोडगा काढला. 

कसे कराल  आधार - पॅन   लिंक?

पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ब्राऊझरवरून प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) ला भेट द्या. वेबसाइटला भेट दिल्यानंतर डाव्या बाजूला दिला गेल्ल्या लाल रंगाच्या लिंक आधार या टॅबवर क्लिक करा. जर आपलं खात नसल्यास नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर एक पेज खुल होईल. त्यावर निळ्या अक्षरात दिलेल्या टॅबवर क्लिक करून प्रोफाइल सेटिंग निवडा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.  Print


News - World | Posted : 2019-07-09


Related Photos