महत्वाच्या बातम्या

 महाशिवरात्रीला यात्रेदरम्यान भाविकांसाठी विशेष बस फेऱ्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाशिवरात्रीला जिल्हयात गायमुख, आंभोरा व प्रतापगड येथे यात्रा भरत असून यात्रेदरम्यान भाविकांसाठी बसस्थानका वरुन यात्रा विशेष रा.प. बसेस चालविण्यात येतात. यावर्षी ८ ते १० मार्च, पर्यंत भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर बसस्थानका वरुन बसेस सोडण्यात येणार आहे. त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

तसेच गायमुख यात्रा- भंडारा- मोहाडी- जांब- लोहारा- गायमुख, तुमसर-आंबागड-गायमुख, तिरोडा-तुमसर-जुना बस स्टँड-आंबागड-गायमुख, गोंदिया-तिरोडा-तुमसर-आबागड-गायमुख, अंभोरा यात्रा,भंडारा-पहेला-चोहा-मोदी-आंभोरा,पवनी-अडयाळ-पहेला-चोहा- मोदी- आंभोरा, भंडारा-मौदा- चापेगडी- वेलतुर आंभोरा, अ. क. प्रतापगड यात्रा, गोंदिया- कोहमारा- नवेगावबांध-अर्जुनी- प्रतापगड, भंडारा- अडयाळ- पालांदूर- अर्जुनी-प्रतापगड, पवनी-लाखांदूर-अर्जुनी-प्रतापगड,तसेच भंडारा बसस्थानकावरुन लाखापाटील (कोका) यात्रेकरिता बस सोडण्यात येणार आहेत. तरी भाविक भक्तांनी बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने कळविले आहे.

  Print


News - Bhandara
Related Photos