आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही-लोनवाही प्रभाग क्र. ०८ येथील रोशन खोब्रागडे (३२) यांचा अल्पशा आजाराने मृत झाला. तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे.
अशी माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविक नरेंद्र भैसारे, नगरसेविका अंजु भैसारे, महिला बालकल्याण उपसभापती पूजा रामटेके, विलास रामटेके, शहर महिला अध्यक्ष प्रीती सागरे, अशोक सहारे, जयश्री कावळे तसेच महिला काँग्रेस कार्यकर्त उपस्थित होते.
News - Chandrapur