आता पॅनकार्ड नसले तरी कर भरता येईल : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्वाची घोषणा केली. पॅनकार्डची जागा आता आधारकार्डने घेतली आहे. देशात १२० कोटी जनतेकडे आधारकार्ड आहे, त्यामुळे तुमच्याकडे पॅनकार्ड नसले तरी कर भरता येईल, अशी मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.
कर परतावा भरताना आतापर्यंत पॅनकार्ड हे अत्यावश्यक मानलं जात होतं. मात्र आता जर पॅनकार्ड नसेल तर तुमचं आधारकार्ड कर परतावा भरण्यासाठी पुरेसं ठरणार आहे. इतकंच नाही तर अन्य कुठेही पॅनकार्डची आवश्यकता भासते तिथे आता आधारकार्डचा उपयोग करता येईल. आपल्या भाषणात बोलताना सीतारमण म्हणाल्या की नव्या बदलांमुळे कामकाजाचा वेळ वाचेल इतकेच नाही तर कारभार पारदर्शक होईल. यासोबत आयकर विभागाशी संबंधित आणखी एक महत्वाची घोषणा त्यांनी केली. यापूर्वी कर परताव्यात काही त्रूटी असल्यास करदात्याला आयकर कार्यालयात खेटा माराव्या लागयच्या. तसेच कर अधिकाऱ्याकडून करदात्याचा छळ झाल्याचेही प्रकार समोर येतात. मात्र आता इलेक्ट्रॉनिक व्यवस्था लागू करण्यात येईल. ज्यामुळे करदात्याला आयकर विभागात जाण्याची गरज पडणार नाही.  Print


News - World | Posted : 2019-07-05


Related Photos