क्रीडा संकुल आरमोरी येथे मोफत योग शिबिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुका क्रीडा संकुल आरमोरी येथे मागील काही दिवसांपासून पतंजली सेवा समिती आरमोरी तर्फे योगाचार्य अजय कालबांधे व धनराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ५ वाजता योग शिबिर भरविण्यात येत आहे.
या योग शिबिराचे मुख्य उद्देश हेच आहे की,धावपळीच्या जीवनात आणि दैनिक कामकाजात मनुष्य संपूर्ण ओझ्याखाली गुंतून गेलेला आहे त्यामुळे स्वतःला वेळ देणे शक्य होत नाही आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात त्यामुळे स्वतःला वेळ देता यावा व आरोग्याची गरज पूर्ण करता यावी याकरिता पतंजली सेवा समितीच्या माध्यमातून योगाचार्य अजय कालबांधे व योग सहकाऱ्यांच्या माध्यमातून योग अभ्यासाचे धडे देण्यासाठी तालुका क्रीडा संकुल आरमोरी येथे सुरू असलेल्या योग शिबिराला नागरिक उत्तम प्रतिसाद देत आहेत आणि सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




