पोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
तालुक्यात येत असलेल्या पोंभुर्णा मार्गावरील जुनोना आसेगाव गावाजवळ प्रवासी ने भरलेली टाटा एस वाहन पलटल्याने एका प्रवाशाचा टाटा एस खाली दबून जागीच मृत्यू झाला तर १४ प्रवाशी जखमी आहेत.केशव कवडूजी मोहुर्ले रा. सावली असे मृताचे नाव असून  जखमींना सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .हा अपघात १ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. 
मृतकाचे शव बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदनाकरिता आणले. जखमीमध्ये विजय सोनुले (४५), मोरेश्वर कावळे (३२), उषा कावळे (२७), रेखा शेंडे (४२), पतृ शेंडे (५०), दामोदर सोनुले (४५), सुखदेव वाढई (५०), अनिता वाढई (४२), आशा सोनुले (४०) ,संतोष गुरुनुले (३२) , छायाबाई वाढई (४२), कुसुम मुमम्डीवार या सर्व जखमींचा उपचार चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात चालू आहे. दोन प्रवाशांना कोणतेही इजा झाली नाही. टाटा एस चा ड्रायवर अपघात झाल्यापासून फरार आहे. 
हे सर्व प्रवासी सोयाबीन काढण्याचा सीजन असल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून हजारो च्या संख्येने वर्धा, चांदुर रेल्वे बडनेरा या गावाकडे सोयाबीन काढण्याकरिता जात होतो. सर्व प्रवासी राहणार सावली  गावातून टाटा एस गाडीत बसून रेल्वे स्टेशन बल्लारपूर ला येत होते. जुनोना आसेगाव गावाजवळ टाटा एस गाडी पलटी झाली. त्या एकूण १६ प्रवासी बसलेले होते.    Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-02


Related Photos