भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू


- वेळेवर उपचार न मिळाल्याने बालकाचे गेले प्राण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील पेनगुंडा येथील पाच  वर्षाच्या बालकाचा  शेतात विषारी सापाच्या  दंशाने  मृत्यू झाल्याची घटना आज २४ ऑगस्ट रोजी घडली आहे.  रंजीत रैनु पुंगाठी असे मृतक बालकाचे नाव आहे. 
रंजीत आपल्या आई वडीलासह शेतात गेला होता. आई - वडील शेतात   काम करीत होते . रंजीत शेतातच खेळत होता. यावेळी  अचानक नाग सापाने त्याला  दंश केला.    आई - वडील त्वरित मुलाला शेतातून गावात घेऊन आले.    गावातील लोकांच्या मदतीने मोटरसायकलवर घेऊन भामरागड येथील  ग्रामीण रुग्णालयात  आनत असताना वाटेतच  धोडराज या गवाजवाळ रंजितची  प्राणजोत मावळली . 
 पेनगुंडा ते भामरागड  अंतर  १५  ते १६  की.  मी. आहे. परंतु   खराब रस्त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी एक ते दोन तासांचा वेळ लागतो.  यामुळेच   रंजितला आपले प्राण गमवावे लागले.   भामरागड ते नेलगुंडा  पर्यंत  रस्ता नाही. त्यामुळे अशा  अनेक लोकांना आपला  जिव गमवावा लागत आहे . तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वेळेवर पोहचू न शकल्याने व उपचार न होऊ शकल्याने आज रंजीत या पाच  वर्षाच्या मुलाला आपल्या जीवाला मुकावे लागले  आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-24


Related Photos