फेसबूक लाइव्ह करताना कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 नागपूरवरून काटोलला जातान भरधाव वाहनात फेसबूक लाइव्ह करीत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.  पंकेश चंद्रकांत पाटील (२७) व संकेत चंद्रकांत पाटील (२७, न्यू कैलासनगर बुद्ध विहाराजवळ) अशी मृत भावांची नावे आहेत. 
हे दोघे भाऊ व त्यांचे मित्र झायलो गाडीने (एमएच ३१ ईके २५३०) काटोल परिसरात पार्टीसाठी जात होते. आपला हा प्रवास इतरांना कळावा म्हणून चालक पंकेश हा फेसबूक लाइव्ह करीत होता. या लाइव्हवर त्यांच्या मित्रांच्या प्रतिक्रियाही येत होत्या मात्र या लाइव्हनेच दोघांचे लाइफ कायमचे संपविले. भरधाव असलेल्या झायलोवरील नियंत्रण सुटले आणि या गाडीने रस्त्याच्या कडेला चार कोलांटउड्या घेतल्या. यात पंकेश व संकेत जागीच ठार झाले. हातला शिवारात काल सायंकाळी हा अपघात घडला. या गाडीत एकूण नऊ जण होते. त्यातील ७ जखमी असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. यातील एकाला मेडिकलमध्ये तर उर्वरित जखमींना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अंकित डोमजी राऊत(२५, मेडिकल चौक, नागपूर), प्रणव शील(२१), अंबुजा शाहू (२१),मलय बिस्वास (२१), अजिंक्य गुडमवार(२३), राकेश डोंगरवार(२४) रा़ सर्व नागपूर अशी जखमींची नावे आहेत. या घटनेचा अधिक तपास काटोल पोलिस करीत आहेत.   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-17


Related Photos