मुल शेतशिवरातून ४३ लाखांचा दारूसाठा जप्त, तस्कर फरार


- तीन वाहने ताब्यात, एलसीबीची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
शेतशिवरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या   पथकाने २९ लाखांचा देशी,विदेशी दारूसाठा आणि १४ लाखांची वाहने असा एकूण ४३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुदेमाल जप्त केला. यावेळी दारूतस्तकर पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई शक्रवारी १४ जूनच्या  रात्राी करण्यात आली. नरसिंग गणवेनवार (अण्णा) असे फरार तस्काराचे नाव आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चारचाकी वाहनाने कामानिर्मित मूलकडे जात होते. मूल शेतशिवरात दारूची तस्करी होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यांनतर पोलीसांनी पंचांसह    घटनास्थाळाकडे धाव घेतली. यावेळी पोलीसांना बघून तेथील तस्करांनी पळ काढला. मात्र, पळणारा नरसिंग गणवेनवार (रा. मूल) हा असल्याचे पोलीसांनी ओळखले. पोलीसांनी एम एच ४० बीएल २६६८, एमएच ३३ ए १५७० आणि एमएच ३१ डीके ९४७९ क्रमांकाची चारचाकी वाहने घटनास्थळावर आढळून आली.
 पोलीसांनी तपासणी केली असता तिन्ही वाहनात सुमारे २९ लाखांचा देशी,विदेशी दारूसाठा आढळून आला. यावेळी दारूसाठा आणि वाहने असा एकूण ४३ लाख ३६ हजार रूपयांचा मुदेमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख,पद्माकर भोयर,महेंद्र भुजाडे,दौलत चालखुरे,कु्रंदनसिग बावरे,सतीश बगमारे,प्रफुल मेश्राम,वामन ढाकणे यांच्या पथकाने केली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-15


Related Photos