साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात मिळाले २५ लाख ९० हजार ५३ रुपये किमंतीचे सोन्याचे व चांदीचे साहित्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
साईबाबा संस्थानला  २५ लाख ९० हजार ५३ रुपये किमंतीचे सोन्याचे व चांदीचे साहित्य देणगी स्वरूपात मिळाले आहेत. 
दावनगेरे (कर्नाटक) येथील श्री शिर्डी साईबाबा सेवा समितीच्‍या वतीने २२ लाख ६५ हजार ६१८ रुपये किंमतीचे ६४२ ग्रॅम वजनाचे सोन्‍याचे कवच असलेल्‍या १०८ रुद्राक्षाच्‍या ०२ माळा व ०३ लाख २४ हजार ४३५ रुपये किंमतीचे ७.७७० कि.ग्रॅम वजनाचे चांदीच्‍या ०२ बादल्‍या (बकेट), ०२ थाळ्या आणि ०१ हार असे २५ लाख ९० हजार ५३ रुपये किंमतीचे सोन्‍याचे व चांदीचे साहित्‍य संस्‍थानला देणगी स्‍वरुपात देण्यात आले असून सदरचे साहित्‍य संस्‍थानचे विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांच्‍याकडे श्री शिर्डी साईबाबा सेवा समितीचे अध्‍यक्ष गिरीष ए.एच.यांनी सुपूर्त केले. यावेळी संस्थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे उपस्थित होते.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-08


Related Photos